Tuesday, April 27, 2021

श्रीरेणुके नमो नम:!

 

एकवीरे नमस्तुभ्यं 
श्रीरेणुके नमो नम:!

नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं 
जगदम्ब विमोहिनि  |
निवार्य च विमोहान् त्वं 
मां पालय च रक्षय || 1 ||
हे जगदंबे, विमोहिनी तुला नमस्कार असो, नमस्कार असो. विमोहांचे निवारण करून तू माझे पालन कर, रक्षण कर. 

इदं जगन्न सत्यं च 
विरलोsहं सुतस्तव |
कथं जीव्यं कथं जीव्यं 
ज्ञायते न हि मातृके || 2 ||
हे जग सत्य नाही. पण या जगात मी तुझा पुत्र  विरळा आहे. आई, कसे जगावे, कसे जगावे, कळत नाही. 

नापराधस्तथापीह
दण्ड्यते सज्जन: कथम् |
विस्मृति: पादयोस्ते या
तदेकं क्लेशकारणम् || 3 ||
अपराध नसतानाही सज्जनाला दंड कसा केला जातो ? तुझ्या चरणांची जी विस्मृती, तेच एक क्लेशाचे कारण आहे. 

देहि देहि स्मृतिं देहि
मह्यं ते पादयोर्मात: |
त्वत्प्रसादात् जयो मे च 
भवेत् सुनिश्चितो मात: || 4 ||
मला तुझ्या चरणांची स्मृती दे, स्मृती दे, स्मृती दे. माते, तुझ्या प्रसादाने माझा जय सुनिश्चित होईल.  

कृपां कुरुष्व मातस्त्वं 
सिंहध्वजे शवासने |
एकवीरे नमस्तुभ्यं 
श्रीरेणुके नमो नम: || 5 ||
हे माते सिंहध्वजे, शवासने, तू कृपा कर. एकवीरे, तुला नमस्कार असो. तुला नमस्कार असो. श्रीरेणुके, तुला नमस्कार असो. तुला नमस्कार असो.

चन्द्रहासं करे धृत्वा 
चन्द्रहासं हि पाहि नु |
वञ्चकेभ्यश्च रक्ष त्वं 
रक्ष मां रक्ष रेणुके || 6 ||
हाती चन्द्रहास म्हणजे खड्ग धारण करून या चन्द्रहासाचे रक्षण कर. हे रेणुके, तू माझे वंचकांपासून रक्षण कर. रक्षण कर. रक्षण कर.

जानासि सकलं मात: 
त्वं मदपेक्षया च मे |
मूढोsहं च विमूढोsहं 
वदामि त्वां पुन: पुन: || 7 ||
हे माते, माझ्यापेक्षा माझे सर्व काही तू जाणतेस. मी मूढ आहे. मी विमूढ आहे, म्हणून तुला पुनः पुन्हा सांगतो.

विशुद्धं मानसं मेsस्तु 
संलग्नं तव पादयो: |
साम्राज्यं मेsस्तु मात: 
सकलहितहेतवे || 8 ||
माझे मन विशुद्ध आणि तुझ्या पायी संलग्न असावे. सर्वांच्या हितासाठी माझे साम्राज्य असावे.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...