वन्दे महाकालीमहाकालौ।
© चन्द्रहासः।
महाकालीमहाकालौ
वन्देऽहं सततं युवाम्।
सौन्दर्यं युवयोर्दृष्ट्वा
संहृष्टं मे मनो यथा॥1॥
हे महाकाली आणि महाकाल, आपल्या दोघांना मी सतत वंदन करतो.
आपले सौन्दर्य पाहून माझे मन आनंदी झाले की, जसे...
मुदितो जायते दृष्ट्वा
लतया सह पादपम्।
सहजं खगबालो वै
तथैवानुभवाम्यहम्॥2॥
पक्ष्याचं पिल्लु वेलीसह
वृक्षाला पाहून सहजच आनंदित होते. खरोखर, मी तसेच अनुभवित आहे.
बालाय रक्षयित्वा वै
ददथो वाञ्छितं युवाम्।
जपति युवयोर्नाम
धन्यो हि भुवनत्रये॥3॥
तुम्ही दोघे माता पिता
बालकाचे रक्षण करता. त्याला जे हैवे ते देता. जो तुमच्या दोघांचे नाम जपतो, तो तिन्ही लोकी धन्य होतो.
न तस्य जायते चिन्ता
दुःखं भयं पुनश्च वा।
युवयोः कृपया भक्तो
मृगेन्द्र इव जीवति॥4॥
आणि त्याला चिन्ता दुःख किंवा भय पुनः उत्पन्न होत नाही.
तुमच्या दोघांच्या कृपेने भक्त सिंहासारखे जगतो.
जनानां स्निग्धता चापि
धन्यता मान्यता तथा।
लभते च यशः श्रेयः
कृपया युवयोः सदा॥5॥
तुमच्या दोघांच्या कृपेने त्याला लोकांचा स्नेहभाव तसेच
धन्यता मान्यता यश आणि श्रेय त्याला लाभते.
दातारौ पितरौ वन्दे
युवामहं सदा सदा।
स्वीकार्यश्च प्रणामो मे
प्रार्थयेऽहं युवां हृदः ॥6॥
हे दातृत्वयुक्त मातापित्यांनो, तुम्हा दोघांना मी नेहमी नेहमी वंदन
करतो. तुम्ही दोघांनी माझा प्रणाम स्वीकारावा, अशी मी तुम्हा दोघांना हृदयापासून
प्रार्थना करतो.
No comments:
Post a Comment