कुसुमाकरशोभां
त्वाम् आह्लादिनीं
प्रमोदिनीम्।
मानसधारिणीं
देवीं वन्दे मनोविनोदिनीम् ।।
वसंत ऋतूची शोभा, आह्लाद
आणि आनंद निर्माण करणारी,
मनाला धारण करणारी, मनाला
आनंदित करणारी अशा देवीला
तुला मी वंदन करतो.
मधुरभाषिणीमाभां लसन्तीं
शिववल्लभाम् ।
भक्तकल्पलतां
देवीं ललितां हसितां शुभाम् ।।
मधुर भाषण करणारी, तेजस्वी, शोभायमान, श्रीशंकरवल्लभा, भक्तांची कल्पल ता, शुभा, हास्यसमन्वित, अशा ललिता देवीला तुला
मी वंदन करतो.
सुधाधारां
मनोधीराम् भक्तानां
हृदये स्थिराम् ।
सुहास्याऽस्यां
सुनेत्रां त्वाम् इक्षुदण्डसमन्विताम् ।।
अमृताची धारा, मनाची धीरता, भक्तांच्या हृदयात स्थिर असणाऱ्या, सुहास्यवदना, सुंदर
नयन असणाऱ्या, उसाचा दंड जवळ असणाऱ्या अशा देवीला तुला मी वंदन करतो.
चारुगात्रामजाज्ञेयाममृतां
पुष्पधारिणीम् ।
सुगन्धां
सुपुष्टां देवीं श्रीचक्रासनसंस्थिताम् ।।
चारुगात्रा, अनादी असल्यामुळे अजा, जिचा पार लागत नाही म्हणून अज्ञेया, अमृता,
पुष्प धारण करणाऱ्या, सुगंधित, सुपुष्ट, श्रीचाक्राच्या आसनावर संस्थित, अशा
देवीला तुला मी वंदन करतो.
त्रिपुरासुन्दरीं
वन्दे संजीवनीं चतुर्भुजाम् ।
त्रिनेत्रां
शिवजायां त्वां प्रसन्नां वरदां सदा ।।
संजीवनी, चतुर्भुजा, त्रिनेत्रा, श्रीशंकरपत्नी, सदैव प्रसन्न आणि वर देणारी
असणाऱ्या त्रिपुरसुन्दरी देवीला, तुला मी वंदन करतो.
षोडशीं
स्वर्णवस्त्रां त्वां राजराजेश्वरीं पराम् ।
श्रीललिताम्बिकां
देवीं चन्द्रहासे कृपां कृताम् ।।
स्वर्णिम वस्त्र लेवलेल्या तुला षोडशी, राजराजेश्वरी, परा, चंद्रहासावर कृपा केलेल्या श्रीललिताम्बिका
देवीला मी वंदन करतो.
|| इति चन्द्रहासविरचितं श्रीललिताम्बिकावंदनम्
||
अभिज्ञान, पुणे प्रस्तुति......
No comments:
Post a Comment