|| अथ श्रीदेव्यपराधक्षमापनस्तोत्रम् ||
श्रीगणेशाय
नम: |
न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः।
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ॥१॥
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया
विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत्।
तदेतत्क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥२॥
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः।
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥३॥
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥४॥
परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पच्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ॥५॥
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ ॥६॥
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः।
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम् ॥७॥
न मोक्षस्याकाङ्क्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः।
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ॥८॥
नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः।
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ॥९॥
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि ।
नैतच्छठत्वं मम भावयेथाः
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति ॥१०॥
जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि।
अपराधपरम्परा परं न हि माता समुपेक्षते सुतम् ॥११॥
मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु ॥१२॥
॥इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं देव्यपराधक्षमापनस्तोत्रम् संपूर्णम्॥
अर्थ
आई ! मला कोणताही मंत्र माहित नाही, यंत्र माहित
नाही. मला स्तुतीही माहित नाही, आवाहन माहित नाही. मला
ध्यानाची माहिती नाही आणि मला स्तोत्र, कथा देखील माहित
नाही. मला तुझ्या मुद्राही माहित नाही. आणि मला व्याकूळ होऊन विलाप करणेही जमत
नाही. पण आई, मी फक्त इतकेच जाणतो की, मला तुझे अनुसरण करायचे
आहे., जे सर्व क्लेश, दु:ख आणि आपत्तींचे हरण करणारे आहे. || १ ||
सर्वांना उद्धरित करणाऱ्या, कल्याणमयी
माते, मला उपासना करण्याची पद्धत माहित नाही, माझ्याकडे पैशाची कमतरता आहे,
मी स्वभावाने खूप आळशी आहे आणि माझ्याकडून योग्य प्रकारे पूजाही
संपन्न होत नाही. या सर्व कारणांमुळे तुझ्या चरणांच्या सेवेमध्ये उद्भवलेल्या
त्रुटी, त्यातील कमतरता याबद्दल मला तू क्षमा करावीस. कारण
मुलगा कुपुत्र होऊ शकतो, पण माता ही कुमाता होऊ शकत नाही. || २ ||
आई ! या पृथ्वीवर तुझी सरळ
स्वभावाची पुष्कळ मुले आहेत पण त्यामध्ये मी तुझा खूप चंचल मुलगा आहे. माझ्यासारखा
चंचल माणूस खूप दुर्मिळ असेल, हे शिवे ! तू मला सोडून
देणे योग्य नाही, कारण
मुलगा कुपुत्र होऊ शकतो, पण माता ही कुमाता होऊ शकत नाही. || ३ ||
जगदंबे माते ! मी कधी तुझी
चरणसेवा केली नाही. तुला कधी जास्त धन समर्पित केले नाही, तरीही माझ्यासारख्या
पामरावर तुझे अतुलनीय प्रेम असेल, तर त्याचे कारण म्हणजे मुलगा कुपुत्र होऊ शकतो,
पण माता ही कुमाता होऊ शकत नाही. || ४ ||
गणेशाला जन्म देणाऱ्या हे माता
पार्वती! अन्य देवतांची आराधना करण्याच्या वेळी मला अनेक प्रकारच्या सेवांमध्ये
व्यस्त राहावे लागे. त्यासाठी पंच्याऐंशी वर्ष आयु व्यतीत झाल्यानंतर मी अन्य
देवतांची आराधना सोडून दिली. आता त्यांची पूजा, सेवा माझ्याने होत नाही. त्यामुळे
त्यांचेकडून साहाय्याची अपेक्षा नाही. यावेळी तू तुझी कृपा माझ्यावर
केली नाहीस, तर आई, निराधार असा मी कोणाला
शरण जाऊ? || ५ ||
हे अपर्णे माते ! जर तुझ्या
मंत्रातील एखादे अक्षरसुद्धा कानावर पडले तर त्याचे फळ असे प्राप्त होते की, मूर्खसुद्धा
मधुपाकांसारख्या गोड वाणीचे उच्चारण करणारा एक चांगला वक्ता होतो. आणि दीन किंवा महादरिद्र
माणूसही करोडो स्वर्णमुद्रांनी संपन्न होऊन चिरकाल पर्यंत निर्भयपणे विहार करतो. जेव्हा
तुझ्या मंत्राच्या एका अक्षराच्या ऐकण्याचा असा परिणाम होतो, तेव्हा जे लोक
विधीपूर्वक तुझ्या जपात रममाण होतात, त्यांना प्राप्त होणारे उत्तम फळ कसे असेल,
यास जाणण्यास कोण समर्थ आहे ? || ६ ||
हे भवानी, जे आपल्या अंगाला
चिताभस्म विलेपित करून राहतात,विष हेच ज्यांचे भोजन आहे, जे दिगंबरधारी
आहेत, ज्यांनी मस्तकावर जटा धारण केल्या आहेत, जे कंठात
नागराज वासुकीला हार म्हणून घालतात, ज्यांच्या हातात
भिक्षापात्र शोभून दिसते, असे भूतनाथ पशुपती सुद्धा जे एकमात्र जगदीश्वराची पदवी
धारण करतात, त्याचे काय कारण आहे, हा महिमा त्यांना कसा प्राप्त झाला, तर तुझ्या
समवेत त्यांचा विवाह झाला म्हणूनच हे महिमान त्यांना प्राप्त झाले. || ७ ||
हे चंद्रमुखी, मला मोक्षाची
इच्छा नाही. जगाचे वैभव प्राप्त करण्याची अभिलाषा नाही, विज्ञानाची
अपेक्षा नाही. आणि सुखाची आकांक्षा नाही. मृडानी, रुद्राणी,
शिव-शिव भवानी असा नामजप करताना माझा जन्म व्यतीत व्हावा, अशी मी तुला
विनंती करतो. || ८ ||
श्यामे, माते ! नाना प्रकारच्या
पूजा सामग्री सहित विधीपूर्वक मी तुझी आराधना करु शकलो नाही. सदा कठोर भावाचे
चिंतन करणाऱ्या माझ्या वाणीने कोणता अपराध केला नाही? तथापि तू स्वयं प्रयत्न करून
माझ्या सारख्या अनाथावर कृपादृष्टी ठेवतेस, ते तूच करू शकतेस. तुझ्या सारखी दयामयी
माताच माझ्या सारख्या कुपुत्रालाही आश्रय देऊ शकते.
|| ९ ||
दुर्गे माते ! हे करुणासिंधु
माहेश्वरी ! जेव्हा मी संकटात
सापडतो तेव्हाच मी तुझे स्मरण करतो. हे माझे शाठ्य समजू नकोस, कारण भुकेलेल्या
आणि तहानलेल्या मुलाला आईची आठवण येते. || १० ||
जगदंबे ! माझ्यावर तुझी
पूर्ण कृपा आहे, यात
आश्चर्य ते काय? कारण मुलगा अनेक अपराध करतो तरी आई त्याची उपेक्षा करीत नाही. || ११ ||
हे महादेवी ! माझ्यासारखा पापी
नाही आणि तुझ्यासारखी पापनाशिनी नाही. असे जाणून
जे योग्य असेल ते कर. || १२ ||
No comments:
Post a Comment