Friday, May 14, 2021

श्रीमनीषापञ्चकम्

 

|| अथ श्रीमनीषापञ्चकम् ||

 

श्रीगणेशाय नम: |

 

उद्यद्भानुसहस्रकोटिसदृशां केयूरहारोज्ज्वलां
विम्बोष्ठीं स्मितदन्तपङ्क्तिरुचिरां पीताम्बरालङ्कृताम् 
विष्णुब्रह्मसुरेन्द्रसेवितपदां तत्त्वस्वरूपां शिवां
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि सन्ततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥१॥

 

मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां पूर्णेन्दुवक्त्रप्रभां
शिञ्जन्नूपुरकिङ्किणीमणिधरां पद्मप्रभाभासुराम् 
सर्वाभीष्टफलप्रदां गिरिसुतां वाणीरमासेवितां 
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि सन्ततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥२॥

 

श्रीविद्यां शिववामभागनिलयां ह्रीङ्कारमन्त्रोज्ज्वलां
श्रीचक्राङ्कितबिन्दुमध्यवसतिं श्रीमत्सभानायिकाम् 
श्रीमत्षण्मुखविघ्नराजजननीं श्रीमज्जगन्मोहिनीं 
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि सन्ततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥३॥

 

श्रीमत्सुन्दरनायिकां भयहरां ज्ञानप्रदां निर्मलां
श्यामाभां कमलासनार्चितपदां नारायणस्यानुजाम् 
वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां नानाविधामम्बिकां 
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि सन्ततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥४॥

 

नानायोगिमुनीन्द्रहृत्सुवसतिं नानार्थसिद्धिप्रदां
नानापुष्पविराजिताङ्घ्रियुगलां नारायणेनार्चिताम् 
नादब्रह्ममयीं परात्परतरां नानार्थतत्त्वात्मिकां 
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि सन्ततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥५॥

 

|| इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं श्रीमनीषापञ्चकम् सम्पूर्णम्  ||

 

अर्थ:

जी उदय होणाऱ्या सहस्रकोटी सूर्यांच्या प्रमाणे कान्तीमती आहे, केयूर आणि हार इत्यादि अलंकारांमुळे भव्य प्रतीत होते, बिंबफळाप्रमाणे जिचे अधरोष्ठ आहेत, मधुर अशा स्मित हास्याने युक्त दंतपंक्तीमुळे जी सुंदर दिसते, जी पीताम्बराने अलंकृत आहे, ब्रह्मा, विष्णु, इंद्र आदि देवांनी जिची चरणसेवा केली आहे, त्या कल्याणकारिणी, तत्त्वस्वरूप अशा, कारुण्यरुपी जलाची निधी असणाऱ्या श्रीमीनाक्षी देवीला मी नित्य वंदन करतो. || ||

 

मोत्याच्या हारांनी सुशोभित मुकुट धारण केल्याने सुंदर दिसणाऱ्या, पूर्ण चंद्राप्रमाणे मुखकांती असणाऱ्या, झंकारयुक्त पैंजण, किंकिणी तथा अनेक रत्न धारण करणाऱ्या, कमळाप्रमाणे आभेने भासित होणाऱ्या, सर्वांना अभीष्टफळ देणाऱ्या, सरस्वती आणि लक्ष्मी यांनी जिची सेवा केली आहे,  अशा कारुण्यरुपी जलाची निधी असणाऱ्या श्रीमीनाक्षी देवीला मी नित्य वंदन करतो. || ||

 

जी श्रीविद्या आहे, भगवान शंकरांच्या वामभागी विराजमान आहे, ह्रीं या बीजमंत्राने सुशोभित आहे, श्रीचक्रांकित बिंदूच्या मध्य म्हणजे केंद्रस्थानी निवास करते, देवसभेचे नेतृत्व करते, श्रीकार्तिकस्वामी आणि श्रीगणेश यांची माता आहे, जगन्मोहिनी आहे, अशा कारुण्यरुपी जलाची निधी असणाऱ्या श्रीमीनाक्षी देवीला मी नित्य वंदन करतो. || ||

 

जी अतिशय सुंदर अशी नेत्री आहे, भयहारिणी आहे, ज्ञानप्रदायिनी आहे, निर्मला आहे, श्यामला आहे, ब्रह्मदेवाकडून जिची पाद्यपूजा संपन्न झाली आहे, श्रीनारायण म्हणजेच भगवान श्रीकृष्णाची जी कनिष्ठ भगिनी आहे, वीणा, वेणू, मृदंग इत्यादि वाद्यांची रसिक, अनेकरूपा अशा त्या अंबिकेला, कारुण्यरुपी जलाची निधी असणाऱ्या, श्रीमीनाक्षी देवीला मी नित्य वंदन करतो. || ||

 

जी अनेक योगीजन आणि मुनिश्रेष्ठांच्या हृदयात निवास करते, विविध सिद्धी प्रदान करते, जिचे चरण विविध पुष्पांनी सुशोभित होतात, श्रीनारायणाने जिची अर्चना केली आहे, तथा जी नादब्रह्ममयी आहे, परात्पर आहे, विविध पदार्थांची तत्त्वात्मिका आहे, अशा कारुण्यरुपी जलाची निधी असणाऱ्या श्रीमीनाक्षी देवीला मी नित्य वंदन करतो. || ||

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...