Monday, May 4, 2015

न कार्या याचना।

॥न कार्या याचना॥
॥डा. चन्द्रहास शास्त्री॥

आशीषं देहि मे माये
न कार्या याचना मया ।
त्वां विहाय च कस्यापि
पुरतश्च कदापि वा॥

आई, आशीर्वाद दे की, तुला सोडून कधीही कोणापुढे याचना मी करू नये.

फेनकानीव वर्तन्ते
सर्वे सुजल्पका इति।
त्वमेव केवलं नित्या
सत्या कृत्या च रेणुके॥

चांगली बडबड करणारे लोक खरोखर फेसाप्रमाणे आहेत. हे रेणुके, तूच केवल नित्य, सत्य व कृत्य करणारी आहेस.

त्वया यद्दर्शितं विश्वं
प्रकटितासि मे मतिः।
त्वदीयकारणादेव
विद्यते देवि, मे गतिः ॥

तु जे विश्व मला दाखवलेस, तूच माझ्यासमोर प्रकट झालीस, असे मला वाटते. हे देवी, तुझ्यामुळेच माझी गती ( अध्यात्मात ) आहे.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...