Friday, May 14, 2021

श्रीललितापञ्चकम्

 

||अथ श्रीललितापञ्चकम् ||

 

श्रीगणेशाय नम: |

 

प्रातः स्मरामि ललितावदनारविन्दं
विम्बाधरं पृथुलमौक्तिकशोभिनासम् 
आकर्णदीर्घनयनं मणिकुण्डलाढ्यं
मन्दस्मितं मृगमदोज्ज्वलभालदेशम् ॥१॥

 

प्रातर्भजामि ललिताभुजकल्पवल्लीं
रक्ताङ्गुलीयलसदङ्गुलिपल्लवाढ्याम् 
माणिक्यहेमवलयाङ्गदशोभमानां
पुण्ड्रेक्षुचापकुसुमेषुसृणिदधानाम् ॥२॥

 

प्रातर्नमामि ललिताचरणारविन्दं
भक्तेष्टदाननिरतं भवसिन्धुपोतम् 
पद्मासनादिसुरनायकपूजनीयं
पद्माङ्कुशध्वजसुदर्शनलाञ्छनाढ्यम् ॥३॥

 

प्रातः स्तुवे परशिवां ललितां भवानीं
त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्याम् 
विश्वस्य सृष्टिविलयस्थितिहेतुभूतां
विद्येश्वरीं निगमवाङ्मनसातिदूराम् ॥४॥

 

प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम
कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति 
श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति
वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति ॥५॥

 

यः श्लोकपञ्चकमिदं ललिताम्बिकायाः
सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते 
तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना
विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिम् ॥६॥

 

|| इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं श्रीललितापञ्चकम् सम्पूर्णम्  ||

 

अर्थ

मी प्रात:काली श्रीललितादेवीच्या मुखकमलाचे स्मरण करतो, की जे बिंबसमान आरक्त आधार, विशाल मोत्याने सुशोभित नासिका आणि कानापर्यंत विस्तृत अर्थात विशाल नयनांनी युक्त आहे. मणिमय कुंडल आणि मंद स्मित यांनी युक्त आहे. तसेच श्रीदेवीचा भालप्रदेश कस्तुरिकातिलकाने सुशोभित आहे. || ||

 

मी श्रीललितादेवीच्या भुजारूपी कल्पलतेचे प्रात:काळी स्मरण करतो. श्रीदेवीच्या भुजा लाल अंगठीने युक्त सुकोमल बोटरूपी पानांनी सुशोभित होतात. या भुजा रत्नखचित सुवर्ण कंकणादि अलंकारांनी शोभून दिसतात. तसेच या भुजांनी  पुण्ड्रेक्षुचाप आणि कुसुममय बाण तसेच अंकुश धारण केले आहेत. || ||

 

प्रात:काली मी श्रीललितादेवीच्या चरणकमलांना नमस्कार करतो. हे चरणकमल भक्तांना अभीष्टफल देणारे आहेत. संसार सागर तरून जाण्यासाठी भक्कम नावेसारखे आहेत. ब्रह्मदेवादि सुरश्रेष्ठांनी पूजित आणि पद्म, अंकुश, ध्वज आणि सुदर्शनादि मंगलमय चिह्नांनी युक्त हे चरण कमल आहेत. || ||

 

मी प्रात:काली परमकल्याणी अशा श्रीललिता भवानीची स्तुती करतो. जिचे ऐश्वर्य वेदान्तवेद्य आहे, जी करुणामयी असल्याने शुद्धस्वरूपा अशी आहे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा मुख्य हेतू म्हणजे  कारण आहे, विद्येची अधिष्ठात्री देवी आहे. वेद, वाणी आणि मनाच्या गतीच्याही दूर आहे. || ||

 

हे श्रीललिते, मी तुझे पुण्यनाम कामेश्वरी, कमला, महेश्वरी, शांभवी, जगज्जननी, परा, वाग्देवी, त्रिपुरेश्वरी, यांचे आपल्या वाणीद्वारे प्रात:काली उच्चारण करतो. || ||

 

माता ललितेच्या अति सौभाग्यप्रद आणि सुललित अशा या पाच श्लोकांचे जो मनुष्य प्रभातसमयी पठन करतो, त्याचेवर प्रसन्न होऊन श्रीललितादेवी त्याला विद्या, धन, विमल सौख्य आणि अनंत कीर्ती प्रदान करते.  || ||

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...