Friday, May 14, 2021

अथ श्रीकनकधारा स्तोत्रम्

 

|| अथ श्रीकनकधारा स्तोत्रम् ||

 


श्रीगणेशाय नम: | श्रीमहालक्ष्म्यै नम: |

 

अङ्गं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती
भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम् 
अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला
माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः ॥१॥

 

मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः
प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि 
माला दृशोर्मधुकरीव महोत्पले या
सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः ॥२॥

 

विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षम्
आनन्दहेतुरधिकं मुरविद्विषोऽपि 
ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्धम्
इन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः ॥३॥

 

आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दम्
आनन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम् 
आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं
भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः ॥४॥

 

बाह्वन्तरे मधुजितः श्रितकौस्तुभे या
हारावलीव हरिनीलमयी विभाति 
कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला
कल्याणमावहतु मे कमलालयायाः ॥५॥

 

कालाम्बुदालिललितोरसि कैटभारेर्
धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव 
मातुः समस्तजगतां महनीयमूर्तिर्
भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनायाः ॥६॥

 

प्राप्तं पदं प्रथमतः किल यत्प्रभावान्
माङ्गल्यभाजि मधुमाथिनि मन्मथेन 
मय्यापतेत्तदिह मन्थरमीक्षणार्धं
मन्दालसं  मकरालयकन्यकायाः ॥७॥

 

दद्याद् दयानुपवनो द्रविणाम्बुधाराम्
अस्मिन्नकिञ्चनविहङ्गशिशौ विषण्णे 
दुष्कर्मघर्ममपनीय चिराय दूरं
नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाहः ॥८॥

 

इष्टा विशिष्टमतयोऽपि यया दयार्द्र-
दृष्ट्या त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते 
दृष्टिः प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां
पुष्टिं कृषीष्ट मम पुष्करविष्टरायाः ॥९॥

 

गीर्देवतेति गरुडध्वजसुन्दरीति
शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति 
सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै
तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरुण्यै ॥१०॥

 

श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफलप्रसूत्यै
रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै 
शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनायै
पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तमवल्लभायै ॥११॥

 

नमोऽस्तु नालीकनिभाननायै
नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभूत्यै 
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै
नमोऽस्तु नारायणवल्लभायै ॥१२॥

 

सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि
साम्राज्यदानविभवानि सरोरुहाक्षि 
त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्यतानि
मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये ॥१३॥

 

यत्कटाक्षसमुपासनाविधिः
सेवकस्य सकलार्थसम्पदः 
संतनोति वचनाङ्गमानसैस्
त्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे ॥१४॥

 

सरसिजनिलये सरोजहस्ते
धवलतमांशुकगन्धमाल्यशोभे 
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे
त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ॥१५॥

 

दिग्घस्तिभिः कनककुम्भमुखावसृष्ट-
स्वर्वाहिनीविमलचारुजलप्लुताङ्गीम् 
प्रातर्नमामि जगतां जननीमशेष
-
लोकाधिनाथगृहिणीममृताब्धिपुत्रीम् ॥१६॥

 

कमले कमलाक्षवल्लभे
त्वं करुणापूरतरङ्गितैरपाङ्गैः 
अवलोकय मामकिञ्चनानां
प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः ॥१७॥

 

स्तुवन्ति ये स्तुतिभिरमूभिरन्वहं
त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम् 
गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो
भवन्ति ते भुवि बुधभाविताशयाः ॥१८॥

 

॥इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं कनकधारास्तोत्रम् संपूर्णम्

 

अर्थ

जसे भ्रमरी अर्धोन्मीलित पुष्पांनी अलंकृत तमाल वृक्षाचा आश्रय घेते, त्याप्रमाणे श्रीहरीच्या रोमांचांनी सुशोभित श्रीअंगांचे ठायी नित्य निवास करणाऱ्या जिचे ठायी संपूर्ण ऐश्वर्याचा निवास आहे, अशी संपूर्ण मंगलांची अधिष्ठात्री देवी भगवतीची कटाक्षलीला माझ्यासाठी शुभदायिनी  होवो. || ||

 

जसे भृंगी महान कमलपत्रावर येऊन जाऊन राहते, तिथे भ्रमत असते, तसे मुरारी श्रीहरीच्या मुखकमलाकडे वारंवार प्रेमपूर्वक जाते आणि लज्जेमुळे परत फिरते, अशा सागरकन्यका लक्ष्मीची मनोहर मुग्ध दृष्टीमाला मला धनसंपत्ती प्रदान करो. || ||  

 

जी सर्व देवतांचे अधिपती इंद्राच्या पदाचे ऐश्वर्य देण्यास समर्थ आहे, मुरारी श्रीहरींना अधिकाधिक आनंद प्रदान करणारी आहे, जी नीलकमळाच्या अंतरंगाप्रमाणे शोभायमान आहे, त्या लक्ष्मीच्या अर्धोन्मीलित नयनांची दृष्टी क्षणभरासाठी माझ्यावरही थोडीशी पडावी.

|| ||

 

शेषशायी भगवान विष्णूंच्या धर्मपत्नी श्रीलक्ष्मीचे ते नेत्र आम्हाला ऐश्वर्य प्रदान करणारे होवो, ज्याच्या पुतळी आणि भुवया प्रेमवश अर्धोन्मीलित आणि एकटक आपल्याकडे पाहणाऱ्या आनंदकंद श्रीमुकुंद आपल्या समीप आहेत, हे पाहून काहीशा तिरप्या होतात. ||||

 

जी भगवान मधुसूदनाच्या कौस्तुभमणीमंडित वक्षस्थलावर इंद्रनील मण्याच्या माळेप्रमाणे शोभून दिसते, तसेच त्यांच्या मनामध्ये प्रेमाचा संचार करणारी आहे, त्या कमलकुंजनिवासिनी कमलेची कटाक्षमाला माझे कल्याण करो. || ||

 

मेघांच्या मालिकेमध्ये वीज चमकते, तसे कैटभशत्रु श्रीविष्णूंच्या मेघमालेप्रमाणे श्यामसुंदर वक्षस्थलावर जी प्रकाशित होते, जिने आपल्या आविर्भावाने भृगुवंशाला आनंदित केले आहे, जी समस्त लोकांची जननी आहे, त्या भगवती लक्ष्मीची पूजनीया मूर्ती मला कल्याण प्रदान करो. || ||

 

समुद्रकन्या कमलेची ती मंद, अलस, मंथर आणि अर्धोन्मीलित दृष्टी, जिच्या प्रभावाने कामदेवाने भगवान मधुसूदनाच्या हृदयात पहिल्यांदा स्थान प्राप्त केले होते, ती दृष्टी इथे माझ्यावर पडो. || ||  

 

भगवान नारायणाच्या प्रिय अशा लक्ष्मीचा नेत्ररूपी मेघ दयारूपी अनुकूल पवनाने प्रेरित होऊन दुष्कर्मरूपी घामाला नेहमीकरिता दूर सारून विषादात पडलेल्या माझ्यासारख्या दीनरूपी चातकावर धनरूपी जलधाराची वृष्टी करो. || ||

 

विशिष्ट बुद्धि संपन्न माणसे जिचे प्रीतिपात्र होऊन तिच्या दयादृष्टीच्या प्रभावाने स्वर्गपद सहज प्राप्त करून घेतात, त्या पद्मासना पद्मेची विकसित कमलाच्या उदरासमान असणारी कान्तीमती दृष्टी मला मनोवांछित पुष्टी प्रदान करो. || ||

 

जी सृजनाच्या वेळी ब्रह्मशक्तीच्या रूपात स्थित होते, पालनाच्या वेळी वैष्णवी शक्तीच्या रूपात विराजमान होते, प्रलयलीलेच्या वेळी रुद्रशक्तीच्या रूपात स्थित होते, त्या त्रिभुवनाचे एकमात्र गुरु भगवान नारायणाच्या नित्ययौवना प्रिया श्रीलक्ष्मीला नमस्कार असो. || १० ||

 

हे माते, शुभ कर्मांचे फळ देणाऱ्या श्रुती रूपात तुला प्रणाम आहे. रमणीय गुणांच्या निधी अशा रतीच्या रूपात तुला नमस्कार आहे. कमलवनात निवास करणाऱ्या शक्तिस्वरूपा लक्ष्मीला नमस्कार आहे. पुरुषोत्तमप्रिया पुष्टीला नमस्कार आहे. || ११ ||

 

कमलवदना कमलेला नमस्कार आहे. क्षीरसिंधुसंभूता श्रीदेवीला नमस्कार आहे. चंद्रमा आणि सुधा यांच्या सख्ख्या बहिणीला नमस्कार आहे. भगवान नारायणाच्या वल्लभेला नमस्कार आहे. || १२ ||

 

कमलासमान नेत्र असणाऱ्या माते, आपल्या चरणी केलेली वंदना संपत्ती प्रदान करणारी आहे. संपूर्ण इंद्रियांना आनंद देणारी आहे. साम्राज्य देण्यासाठी समर्थ आहे. समस्त पापांना नष्ट करण्यास सर्वथा उद्युक्त आहे. मला तुझ्या चरणवंदनेची शुभ संधी सदैव प्राप्त होवो. || १३ ||

 

जिच्या कृपाकटाक्षासाठी केलेली उपासना उपासकांसाठी संपूर्ण मनोरथ आणि संपत्तीचा विस्तार करणारी आहे, श्रीहरीची हृदयेश्वरी अशा तुझे लक्ष्मीदेवीचे मी मन, वाणी आणि शरीराने भजन करतो. || १४ ||   

 

भगवती हरिप्रिये, तू कमलवनात निवास करतेस. तुझ्या हाती लीलाकमल सुशोभित आहे. तू अत्यंत उज्ज्वल वस्त्र, गंध आणि माला आदींनी शोभून दिसतेस. तुझे रूप मनोहर असे आहे. त्रिभुवनाचे ऐश्वर्य प्रदान करणाऱ्या हे देवी, तू माझ्यावर प्रसन्न हो. || १५ ||

 

दिग्गजांनी सुवर्ण कलशाच्या मुखांनी आवर्षित आकाशगंगेच्या निर्मल आणि मनोहर जलाने ज्यांच्या श्रीअंगांचा अभिषेक केला जातो, संपूर्ण लोकांचे अधीश्वर, भगवान विष्णूंच्या गृहिणी, क्षीरसागरकन्या, त्या जगज्जननी लक्ष्मीला मी प्रात:काली प्रणाम करतो. || १६ ||

 

कमलनयन केशवाच्या कमनीय कामिनी, कमले, मी दीनजनांमध्ये अग्रगण्य आहे. म्हणूनच तुझ्या कृपेचा स्वाभाविक पात्र आहे. तू उसळणाऱ्या करुणेच्या तरल तरंगांच्या समान असणाऱ्या कटाक्षांनी माझ्याकडे पहा. || १७ ||  

 

जे लोक या स्तुतींद्वारे प्रतिदिन वेदत्रयीस्वरूपा त्रिभुवनजननी भगवती लक्ष्मीचे स्तवन करतात, ते या भूतलावर महान गुणवान आणि अत्यंत सौभाग्यशाली होतात. तथा विद्वान माणसेही त्यांचे मनोभाव जाणण्यासाठी उत्सुक असतात. || १८ ||  

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...