Friday, May 14, 2021

श्रीभवान्यष्टकम्

 

|| अथ श्रीभवान्यष्टकम् ||

 

श्रीगणेशाय नम: |

 

न तातो न माता न बन्धुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता ।

न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ।।।।

 

भवाब्धावपारे महादुःखभीरु पपात प्रकामी प्रलोभी प्रमत्तः ।
कुसंसारपाशप्रबद्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ।।
।।

 

न जानामि दानं न च ध्यानयोगं न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रम् ।
न जानामि पूजां न च न्यासयोगं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ।।
।।

 

न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् ।
न जानामि भक्तिं व्रतं वापि मात गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ।।
।।

 

कुकर्मी कुसङ्गी कुबुद्धि: कुदासः कुलाचारहीन: कदाचारलीन: ।
कुदृष्टि: कुवाक्यप्रबन्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ।।
।।

 

प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निशीथेश्र्वरं वा कदाचित् ।
न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ।।
।।

 

विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये ।
अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ।।
।।

 

अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदीन: सदा जाड्यवक्त्रः ।

विपत्तौ प्रविष्टः प्रनष्ट: सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ।।।।

 

|| इति श्रीमच्छड़्कराचार्यकृतं भवान्यष्टकं सम्पूर्णम् ||

 

अर्थ

हे भवानी, पिता, माता, बंधू, दाता, पुत्र, पुत्री, सेवक, मालक, पत्नी, विद्या आणि उपजीविका यापैकी काहीही माझे नाही. हे भवानी माते, आता केवळ तूच माझी गती आहेस, माझे शरण्यस्थान आहेस. || ||

 

मी अपार अशा या भवसागरात आहे. मोठमोठ्या दु:खांनी भयभीत आहे. कामी, लोभी, उन्मत्त असा मी या संसाराच्या दुश्चक्रात बद्ध झालो आहे. हे भवानी माते, आता केवळ तूच माझी गती आहेस, माझे शरण्यस्थान आहेस. || ||

 

हे भवानी, मला दान देणे माहित नाही, ध्यान कसे करावे, ते माहित नाही. तंत्र, स्तोत्र, मंत्र यांचेही ज्ञान मला नाही. पूजा आणि न्यास इत्यादि विषयांतही मी अनभिज्ञ आहे. हे भवानी माते, आता केवळ तूच माझी गती आहेस, माझे शरण्यस्थान आहेस. || ||

 

मी पुण्य जाणत नाही. मी तीर्थ जाणत नाही. मला मुक्ती आणि लय माहित नाही. हे माते, मला भक्ती आणि व्रत देखील माहित नाही. हे भवानी माते, आता केवळ तूच माझी गती आहेस, माझे शरण्यस्थान आहेस. || ||

 

मी कुकर्मी, वाईट संगतीने युक्त, दुर्बुद्धी, दुष्टांचा दास, कुलाचाराने रहित, दुराचारपरायण, कुदृष्टीने युक्त, दुर्वचन बोलणारा आहे. हे भवानी माते, आता केवळ तूच माझी गती आहेस, माझे शरण्यस्थान आहेस. || ||  

 

हे शरणागतवत्सले, मी ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, सूर्य, चंद्र तथा अन्य कोणत्याही देवतेस जाणत नाही. हे भवानी माते, आता केवळ तूच माझी गती आहेस, माझे शरण्यस्थान आहेस. || ||

 

हे शरणागतवत्सले, तू विवाद, विषाद, प्रमाद, परदेशगमन तसेच जलस्थानी, अग्नीस्थानी, पर्वतामध्ये, वनात, शत्रूंमध्ये माझे नेहमी रक्षण कर. हे भवानी माते, आता केवळ तूच माझी गती आहेस, माझे शरण्यस्थान आहेस. || ||

 

मी अनाथ, दरिद्री, जराजीर्ण रोगी, अत्यंत दुर्बल, दीन, सदा मूक, तसेच नेहमी संकटात सापडलेला, नष्टप्राय असा आहे. हे भवानी माते, आता केवळ तूच माझी गती आहेस, माझे शरण्यस्थान आहेस. || ||

 


(सारांश, या श्लोकात भगवान श्री आदि शंकराचार्य यांनी वरील प्रमाणे वर्णन केलेला मनुष्यसुद्धा भगवतीला आर्तभावाने शरण जाऊन आपले हित साधू शकतो, अशी भावना व्यक्त केली आहे.)

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...