Tuesday, April 27, 2021

शोभते संस्कृतिः॥

 

शोभते संस्कृतिः॥
डा चन्द्रहासशास्त्री सोनपेठकर

शोभते संस्कृतिर्नो वै
यत्र शास्ता न केवलम्।
भगवान्नत्र पुत्रश्च 
पिता माता च कन्यका॥

खरोखर आमची संस्कृती सुंदर आहे. जेथे भगवान केवल शासक नाही; तर पिता (उदा.श्रीशिवपार्वती) माता(उदा. श्रीजगदंबा रेणुका) पुत्र(उदा. श्रीकृष्ण) कन्या(उदा. हिमनगदुहिता) आहे.

अत्र शक्यं तु कर्तुं तद्
व्यतीतं जीवनं नृभिः।
भगवता सह प्रेम्णा
भक्त्या वान्यथा तथा॥

भगवंता सोबत प्रेमाने (उदा. संत मीराबाई), भक्तीने (उदा. संत नामदेव महाराज) किंवा अन्यथा म्हणजे विरोध करून (जसे रावणादि) मनुष्य जीवन व्यतीत करू शकतो. थोडक्यात भगवंतासोबत जगू शकतो.

विषयोऽयं गभीरश्च
श्रेष्ठोऽस्ति खलु किन्तु किम्।
परिमितामतिर्मे वै
तस्माच्च विरमाम्यहम्॥

हा विषय खरच श्रेष्ठ व गंभीर आहे; पण काय? माझी मती मर्यादित आहे; म्हणून मी थांबतो.

© चन्द्रहासः।

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...