Tuesday, April 27, 2021

॥आध्यात्मिक अनुभव लक्षण॥

 

॥आध्यात्मिक अनुभव लक्षण॥
           
श्लोकरचना- चन्द्रहास शास्त्री

येऽनुभवास्तु वक्तव्याः
नाध्यात्मिका हि ते खलु।
शब्दायन्ते न ये ते हि
सन्ति चाध्यात्मिकाः सदा॥

खरोखर जे अनुभव सांगणे शक्य आहे, ते आध्यात्मिक नसतातच. आणि ज्यांना शब्दबद्ध करता येत नाही, तेच अनुभव नेहमी आध्यात्मिक असतात.

अथवा ये न जायन्ते
खविषयाः कदाचन।
तानेवाध्यात्मिकान् सुहृद्
गणयन्ति बुधा जनाः॥

अथवा जे अनुभव कधी इंद्रियांचा विषय होत नाहीत, मित्रा, त्यांनाच बुद्धिमंत लोक आध्यात्मिक मानतात.

अथवाऽनुभवा मित्र
प्रकटयन्ति ये स्वयम्।
नरे निर्विकारे शान्ते
ते एवाध्यात्मिकाः खलु॥

अथवा मित्रा, जे  अनुभव निर्विकार शांत माणसाचे ठिकाणी स्वयमेव प्रकट होतात, तेच खरोखर आध्यात्मिक होत.

जय श्रीकृष्ण।

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...