Tuesday, April 27, 2021

'लघुता गौरवाय।'

 

'लघुता गौरवाय।'
चन्द्रहास सोनपेठकर

          समोर कोणीही असो, तो समजदार असेल; तर त्याने आपल्याला आशीर्वादच दिला पाहीजे. असं आपलं बोलणं वागणं आणि एकंदर व्यक्तिमत्त्व हवं.
            
काहीच लोकांकडे असं व्यक्तित्त्व असतं. भारतीय भाषांमध्ये त्याला फार सुन्दर शब्दंय; लाघव.
            लाघव या शब्दाची व्याख्या सबोल विनम्रता अशी करता येईल. लाघव या शब्दात विनम्रता असतेच. पण ती विनम्रता बोलकी असते.
            
थोरपण असूनही विनम्रता; गुणांची संपन्नता असूनही अहंकाराचा अभाव आणि त्या सोबतच शक्य तोवर लहान,मोठे सर्वांना आपल्याकडून आनंदी ठेवण्याचा, सन्मान देण्याचा प्रयत्न असतो.
            गुणग्राहकता असते. आपण गुणी आहोत तसे अनेक जण गुणी असू शकतात ही जाणीव असते.
            अशी माणसं अडचणी, कारणं यापेक्षा सोल्युशनवर भर देतात. कदाचित ही माणसं फार कमी किंबहूना आपल्या समान लोकांकडेच अभिव्यक्त होत असावीत. मला कधी कधी प्रश्न पडतो;
          
  "माणसांसमोर इतक्या लाघवाने व्यक्त होणारी ही माणसं भगवंतासमोर कशी व्यक्त होत असतील? किती 'आर्त्त' भावाने बोलत असतील? भगवंत तर सर्वशक्तिमान, मग भगवंताशी किती छान बोलत असतील?"
             एकदा ऐकायला हवं ना आपण? शाकुंतलातील 'प्रियंवदेचं' पात्र असं असण्याची शक्यता वाटते.
          
   इतकंच सांगतो; इंटलिजन्सपेक्षा इनोसन्स दुर्मीळ असतो. इंटलिजन्स असू शकतो चांगल्या वाईट मध्यम अशा कोणाकडेही. इनोसन्स मात्र फक्त चांगल्याकडेच असतो. म्हणून मी तरी इंटलिजन्सपुढे झुकत असेनही; पण इनोसन्ससमोर 'कृतांजली' असतो. 'प्राञ्जलिरानतोस्मि' असा असतो.
"गुणा गुणज्ञेषु गुणा भवन्ति॥"
अर्थात गुणी जनांमध्ये गुणांचा गुणाकार होत असतो.

जय श्रीकृष्ण।।

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...