Tuesday, April 27, 2021

अहंकारो नायातु माम्।।

 

अहंकारो नायातु माम्।।
©
चन्द्रहासः।

एक एव ह्यहंकारः
सर्वनाशाय सक्षमः।
ब्रह्मदेव वद त्वं किम्
अन्यदोषप्रयोजनम्।।

एकच अहंकार सर्वनाशासाठी सक्षम असताना, हे ब्रह्मदेवा, तू अन्य दोषांचे प्रयोजन तरी सांग.

प्रगतिं सुगतिं चापि
संवादं भाषणं तथा।
सहवास: सकार्यं च
नश्यते तेन सहजम्।।

प्रगती, सुगती, संवाद, भाषण, सहवास आणि सोबतचे कार्य यांचा अहंकारामुळे सहजच नाश होतो.

नरो व्यवहरन्नन्ध
इव करोति कर्म वै।
सदात्याज्यः सदात्याज्यः
सोऽहंकारः नृणा सदा।।

माणूस आंधळ्याप्रमाणे व्यवहार करत कर्म करतो. माणसाने त्या अहंकाराचा नेहमी, नेहमी, नेहमी त्याग करावा.

नृणा कार्यं सदैकं वै
श्रीदेवीपादसेवनम्।
दर्पत्यागो हि शक्यो वै
श्रीमातृकृपया तथा।।

म्हणून माणसाने एक कार्य नेहमी करावे. ते म्हणजे श्रीदेवीची चरणसेवा. देवीमातेच्या कृपेने दर्प म्हणजे अहंकाराचा त्याग करणे शक्य होतो.

प्रार्थना चंद्रहासस्य
दर्पो नायातु मां दिने।
रात्रौ च गमने वादे
स्नेहे क्षणेऽपि वा तथा।।

चन्द्रहासाची प्रार्थना आहे की, दिवसा रात्री प्रवासात भाषणात प्रेमात एका क्षणीही दर्प म्हणजे अहंकार माझ्याकडे येऊ नये.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...