Tuesday, April 27, 2021

॥मनोविचारः॥

 

संस्कृतकविचन्द्रहासविरचित-
काव्यम्
॥मनोविचारः॥

मनो विद्यते ब्रह्मणो नूनमेकं
न तावत् परं शक्तियुक्तं किमन्यत्।
विचारो सुजातो च चित्ते तथैव
सुकाले हि चाप्ते स याति प्रभावम्॥

परब्रह्मानंतर मनच शक्तियुक्त आहे. अन्य काहीही तेवढे ताकदवर नाही. जो विचार चित्तात निर्माण झाला तो योग्य काल आला असता तसाच परिणामाप्रत जातो.

अतोऽस्मिन् नृभिर्रक्षितव्यं मनश्च
प्रयत्नेन तद्दुर्विचारात् सदैव।
कदा चान्यथा जायते कस्य कोऽपि
नु संकल्प एषः पश्य मित्र मे त्वम्॥

म्हणून माणसांनी प्रयत्नपूर्वक व नेहमी वाईट विचारांपासून मनाचे रक्षण करावे. खरोखर कधी कोणाचा कोणता असा संकल्प अन्यथा जातो, मित्रा तूच पहा.

युगान्तेऽपि वा तद्क्षणे वा विचाराः
स्वरूपं तु गन्तुं समर्थाः सदा ते।
विचारेण सर्वं भवेदुद्भवेच्च
सुवर्धेत नश्येत्तथाऽस्मिन् च लोके॥

त्याच क्षणी असो वा युगांतीही असो विचार हे साकारण्यास नेहमी समर्थ असतात. विचाराने सर्व काही होईल आणि उद्भवेल. या लोकी विचाराने वृद्धी व नाश होवू शकतो.

© चन्द्रहासशास्त्री सोनपेठकर

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...