Tuesday, April 27, 2021

॥ Friends & Students भगवत्कृपाप्रसादाचे प्रत्यक्ष रूप॥

 

Friends & Students भगवत्कृपाप्रसादाचे प्रत्यक्ष रूप॥

एन सी ई आर टी, दिल्ली येथे ऑगस्ट महिन्यात संस्कृत विषयाचे प्रेझेंटेशन करण्यासाठी जातोय. त्याची तयारी सुरु आहे. खरं तर मी सोडून सर्व जण काम करताहेत; असंच म्हणण्याचा मोह होतोय.

प्रथम पायरीः डाटा कलेक्शन:
यातही Friends & students ची मदत.

द्वितीय पायरी: डाटा विश्लेषण:
यातही ज्येष्ठ सहकारी आणि छात्रांची मदत

तृतीय पायरीः प्रेझेंटेशनची तयारी:
प्रकृती अस्वास्थ्य आहे म्हणून मी ज्यांना काळजी घ्या सांगतोय; त्यांनी देखील जे काम करण्याची विनंती (?) केली, ते काम पूर्ण केलंय.

बरं कामाची चर्चा करताना सुद्धा मी काय म्हणालो,
"
हे काम आपल्याला लवकर पूर्ण करायचंय. लवकर पूर्ण नाही झालं तर मी तुम्हाला please आणि Thanks म्हणायला सुरू करीन!"
आपल्या शिक्षकाकडून please & thanks म्हणलं जाऊ नये यासाठी काळजी घेणारे असे हे students ग्रेटच! Friendsचेही तसेच! काम झालंय, लवकर घेऊन जा म्हणून सांगतायंत. माझंच जाणं होत नाहीये.

भगवंता, तुझे अनंत उपकार! तुला अनंत कोटी धन्यवाद!!!
खरंच, भगवंताने इतके कृपाळु Friends & समजूतदार students सर्वाना द्यावेत.

तसं मी या विषयावर अनेकदा लिहीलंय आणि भविष्यातही अनेकदा लिहीणार आहे. अनुभवच तसे आहेत, Friends & Students चे. माझाही एकट्याने काम करण्यापेक्षा त्यात अधिकाधिक लोकांना जोडण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे सकारात्मक उर्जा वाढते.

जय श्रीकृष्ण!!!

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...