Tuesday, April 27, 2021

न्यायो ध्येयं भवेत् ॥

 

न्यायो ध्येयं भवेत् ॥
©
चन्द्रहासः।

प्रभुत्वे ते परीक्षाऽस्ति
मनुष्यत्वस्य मानव।
आयाति याति सत्ता सा
मनुष्यत्वं हि सुस्थिरम्॥1
हे मानवा, तुझ्या माणूसकीची परीक्षा तुला मिळालेल्या सत्तेत असते. सत्ता येते आणि जाते. माणूसपणच स्थिर राहणारे असते.

अन्यायो न हि कार्यो वै
प्रभुत्वसमये त्वया।
न्यायमार्गेण गत्वा त्वं
मानुषं परिपालय॥2
सत्ता लाभली असताना तू अन्याय करू नयेस. न्यायमार्गाने जाऊन माणूसकी जपावीस.

स्नेहान्धोऽस्ति मदान्धाद्धि
श्रेष्ठतरो न संशयः।
स्नेहस्त्वस्तु समानो वै
सर्वेषु मानवेषु च॥3
सत्तेच्या गर्वाने आंधळा झालेल्यापेक्षा प्रेमाने आंधळा झालेला माणूस निःसंशय श्रेष्ठ असतो. मात्र तो स्नेह सर्व मानवांवर सारखाच असावा.

प्रसिद्धो जन्मना कोऽपि
सिद्धस्तु कर्मणा एव।
जायते मानवः सत्यं
न विस्मर कदापि च॥4
प्रतिष्ठित घरात जन्म घेऊन कोणीही प्रसिद्ध होऊ शकेल; पण खरोखर माणूस आपल्या कर्मांमुळे यशस्वी होत असतो. हे कधीही विसरू नकोस.

दैवं पश्यति दत्वा त्वां
सत्तां रूपं धनं तथा।
कर्मभिः शक्यते तेषां
दीर्घं वाऽल्पं तु जीवनम्॥5
दैव सत्ता रूप आणि पैसा देऊन तुला पाहत असते. त्यांचे आयुष्य दीर्घ की अल्प हे कर्मांनी ठरत असते.

न्यायो ध्येयं भवेत् तस्मात्
सर्वेषां सार्वकालिकम्।
भवेयुः दृढसङ्कल्पाः
बद्धपरिकरा जनाः॥6
म्हणून न्याय हे सर्वांचे सर्वकाळी ध्येय झाले पाहीजे. त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प व कटिबद्ध व्हावे.
जय श्रीकृष्ण!!!

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...