Tuesday, April 27, 2021

सदा सदा सदा सदा॥

 

सदा सदा सदा सदा॥

रचना- चन्द्रहास दु. सोनपेठकर

विस्मरेयं न पादौ ते
क्षणमेकं हि रेणुके।
सुखे भवतु ते दृष्टिः
ममोपरि च मातृके॥1
हे रेणुके, एक क्षण ही मी तुझ्या चरणांना विसरू नये. हे माते, सुखात (मी सुखात असताना) तुझी दृष्टी माझ्यावर ठेव.

अल्पे प्राप्ते सुखेऽपि त्वां
विस्मरिष्यामि मे भयम्।
अभयदायिनी साक्षात्
दूरीकुरुष्व मे भयम्॥2
अल्प ही सुख लाभले असता तुला विसरेन असे भय मला वाटते. तू साक्षाद् अभयदायिनी आहेस. माझे भय दूर कर.

दुःखादपि सुखे मातस्
स्मरणमधिकं भवेत्।
कृपाफलं हि ते मत्वा
भोज्यं मया सुखं सदा॥3
हे माते, दुःखापेक्षाही सुखात (तुझे) स्मरण अधिक व्हावे. मी सदैव तुझे कृपाफल मानून सुख आस्वादावे.

सत्यं तदेव विश्वाम्बे
न हि सुखं विना कृपाम्।
इच्छाम्यहं कृपायै ते
सदा सदा सदा सदा॥4
हे जगदंबे, तेच सत्य आहे की, कृपेविना सुख नाहीच. मी नेहमी तुझ्या कृपा इच्छितो.

तस्मात्त्वं हि कृपां कृत्वा
स्मारय नाम ते मया।
तस्माद् सिद्धाश्चतुवर्गा
भवन्ति नात्र संशयः॥5
म्हणून तूच कृपा करून तुझे नाम माझेकडून स्मरवून घे. त्यामुळे चारही पुरुषार्थ सफल होतील, यात शंका नाही.

 

॥आध्यात्मिक अनुभव लक्षण॥

 

॥आध्यात्मिक अनुभव लक्षण॥
           
श्लोकरचना- चन्द्रहास शास्त्री

येऽनुभवास्तु वक्तव्याः
नाध्यात्मिका हि ते खलु।
शब्दायन्ते न ये ते हि
सन्ति चाध्यात्मिकाः सदा॥

खरोखर जे अनुभव सांगणे शक्य आहे, ते आध्यात्मिक नसतातच. आणि ज्यांना शब्दबद्ध करता येत नाही, तेच अनुभव नेहमी आध्यात्मिक असतात.

अथवा ये न जायन्ते
खविषयाः कदाचन।
तानेवाध्यात्मिकान् सुहृद्
गणयन्ति बुधा जनाः॥

अथवा जे अनुभव कधी इंद्रियांचा विषय होत नाहीत, मित्रा, त्यांनाच बुद्धिमंत लोक आध्यात्मिक मानतात.

अथवाऽनुभवा मित्र
प्रकटयन्ति ये स्वयम्।
नरे निर्विकारे शान्ते
ते एवाध्यात्मिकाः खलु॥

अथवा मित्रा, जे  अनुभव निर्विकार शांत माणसाचे ठिकाणी स्वयमेव प्रकट होतात, तेच खरोखर आध्यात्मिक होत.

जय श्रीकृष्ण।

चन्द्रहासविरचितं काव्यकुसुमं ॥सम्पदाऽयाति शाश्वती॥

 

चन्द्रहासविरचितं काव्यकुसुमं
॥सम्पदाऽयाति शाश्वती॥

स्वच्छशुद्धपवित्राणां
नार्थः समो हि भावयेत्।
उत्तमोत्तमसोपानं
मत्वा व्यवहरेत् तथा॥1

स्वच्छ शुद्ध आणि पवित्र यांच्या समान अर्थाची कल्पना करू नये. या चढत्या क्रमाने उत्तमोत्तम पाय-या आहेत; असे समजून व्यवहार करावा.

मार्जकेण भवेत् स्वच्छं
शुद्धं तु क्रीयतेऽग्निना।
पवित्रं प्रोक्षणात् भवेत्
मनः स्वर्णं गृहं तथा॥2

घर झाडूने मन दुर्विचार मिटवून व सोने ब्रशने स्वच्छ होते. मन ज्ञानाच्या अग्नीने, सोने तापवून  भेसळ दूर करून व घर दिवा लावून शुद्ध केले जाते. मन सुविचारांचे, घर सडासंमार्जनाचे; व सोने रिठ्याचे/ कावेचे पाणी शिंपडून पवित्र होते.

चित्ते हि पवित्रे जाते
तथैव सदनं भवेत्।
पवित्रे सदने स्वयं
सम्पदाऽयाति शाश्वती॥3

चित्त पवित्र झाले, तर घर तसेच म्हणजे पवित्र होईल. आणि अशा पवित्र घरात  शाश्वत सम्पदा स्वतःहून येते.

कविचन्द्रहासविरचितं ॥सिंहस्थस्तवनम्॥

 

कविचन्द्रहासविरचितं ॥सिंहस्थस्तवनम्॥

हैन्दवाः मुदिताः सर्वे
सिंहस्थः पुण्यदो महान्।
नत्वा हरिहरौ स्नान्ति
गोदायाः क्षेत्रयोः जनाः॥1

सिंहस्थ मोठा पुण्यप्रद आहे. सर्व हिन्दुजन आनंदी आहेत. हरिहरांना नमस्कार करून गोदेच्या दोन क्षेत्री लोक स्नान करतात.

पुरारिश्च मुरारिश्च
निरामयत्वदौ खलु।
एष अवसरः प्राप्तुं
संकल्पदां कृपां तयोः॥2

भगवान शिव आणि भगवान विष्णु हे आम्हाला निरामयता प्रदान करणारे आहेत. संकल्प सिद्ध करणारी अशी त्यांची कृपा प्राप्त करण्याचा हा अवसर आहे.

सतामागमनं पुण्यं
वासः गोदातटे नृणाम्।
गौतम्या दर्शनं पुण्यं
स्नानं पुण्यं च पावकम्॥3

संताचे आगमन पुण्यवाचक तसेच गोदातटी माणसाचे राहणे पुण्यवाचक. गोदेचे दर्शन पुण्यवाचक. आणि स्नान पुण्यवाचक व पावन करणारे आहे.

सुजनो साधुतां यान्ति
चात्र स्मृत्वाऽमृतं खलु।
अभिषेकः सुधायाऽत्र
भक्तिरेव सुधा स्मृता॥4

येथे सज्जन अमृतस्मरण करून साधुत्वाला प्राप्त करतो. येथे सुधेचा म्हणजे अमृताचा अभिषेक केला जातो. भक्तिसच सुधा म्हटले जाते.

एषा धर्मसभा पूर्वा
शास्त्रचर्चा तथैव च।
अद्यापि धर्मचर्चा वै
भवेदत्र सुमङ्गला॥5

ही (पर्वणी) पूर्वी धर्मसंसद होती. तसेच मर्मचर्चा होती. आजही येथे पवित्र अशी धर्मचर्चा व्हावी.

अग्रेसरो भवेद् हिन्दुः
ज्ञानविज्ञानसंयुतः।
शुभदा केसरीकेतुः
विश्वेऽस्मिन् मण्डिता भवेत्॥6

ज्ञानविज्ञानसहित असा हिंदु अग्रेसर व्हावा. शुभदा अशी केसरी पताका या विश्वात डौलाने फडकावी.

अवर्षणं न जायेत
वृष्टिर्भवतु तुष्टिदा।
अकाले मा भवेत् वृष्टिस्
तु पर्याप्ताऽस्तु सा तथा॥7

दुष्काळ पडू नये. संतोषप्रद वृष्टी व्हावी. अकाली वृष्टी होवू नये. तर ती तशी पर्याप्त असावी.

वृद्धिर्भवतु शान्तिश्च
स्वस्तिर्भवतु हर्षदा।
परमोत्कर्षिणी गोदा
भवतु धनधान्यदा॥8

आनंददायी वृद्धी व्हावी. शान्ती असावी. कल्याण व्हावे. परम उत्कर्ष साधणारी गोदा धनधान्य देणारी होवो.

श्रीगोदां मातृकां नत्वा
प्रार्थये स्वस्तये च नः।
प्रसन्नाऽस्तु सदा माता
कृपाकरी भवेत् सदा॥9

श्रीगोदामाईला वंदन करून आमच्या कल्याणार्थ प्रार्थना करतो.    माता नेहमी प्रसन्न असावी तिने नेहमी कृपा करणारी व्हावे.

कविचन्द्रहासरचित- ॥कर्मप्रशंसनम्॥

 

कविचन्द्रहासरचित-
॥कर्मप्रशंसनम्॥

सौकर्येण हि यद् प्राप्तं
तद् कर्मणेति भण्यते।
कठिणे निन्द्यते भाग्यं
येन सः जयते न वै॥1
जो सुलभतेने जे प्राप्त झाले, ते कर्मामुळे झाले; असे म्हणतो आणि कठिण जात असता भाग्याला दोष देतो, तो विजयी होऊ शकत नाही.

भाग्यं तु तमसाच्छन्नं
कर्मणा तद् प्रकाश्यते।
सूर्याभावे तु किं कार्यं
कमलस्य सरोवरे॥2
भाग्य हे अंधःकाराने झाकलेले असते. ते कर्माने प्रकाशित होते. सूर्याच्या अभावी सरोवरातील( सूर्यविकासी ) कमलाचे काय काम?

भाग्यं तु जडवत् मन्ये
सुस्थिरं तद् तथैव हि।
कर्मप्रधानलोकोऽयं
वीरा भोग्या वसुन्धरा॥3
भाग्य हे जडासारखे वाटते. ते तसेच राहते. हे जग मात्र कर्मप्रधान आहे. वीराने राज्य भोगावे. ( असे वचन आहे. )

कर्मण्येवाधिकारस्ते
भगवान्नप्युवाच तद्।
विस्मृत्य वचनं तस्य
जनाः स्मरन्ति तं कथम्॥4
तुझा केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे; असे भगवंतांनीही म्हटले आहे. त्याचे वचन विसरून लोक त्याला कसे आठवतात?

उपदेशमनुसृत्य
वर्तनं दुष्करं तथा।
उपदेशं तु विस्मृत्य
वर्तनं सुकरं तथा॥5
उपदेशानुसार तसे वागणे कठिण आणि उपदेश विसरून वर्तन करणे तसे सोपे असते.

नासाध्यं यत्नशीलाय
किं साध्यमितराय च।
तेनाऽवलम्ब्यते भाग्यं
हितं स्थास्यति कर्मणि ॥6
प्रयत्नशील माणसाला काही असाध्य नाही. आणि प्रयत्नशील नसणारास काय साध्य आहे? तो भाग्यावर अवलंबून राहतो आणि हित कर्मात वसते.

यन्नजानामि तद् किं वा
सुपरिवर्तितं भवेत्।
यद् ज्ञातुं शक्यते तत्तु
सुपरिवर्तितं भवेत्॥7
जे मी जाणत नाही, ते बदलणे सोपे कसे होईल? जे मी जाणतो, ते मात्र बदलणे सोपे होईल.

तस्माद् मित्र त्वया कर्म
स्वाराध्यं हि सदा सदा।
प्रणम्य भगवत्पादौ
वाचमनुचरन् तथा॥8
म्हणून मित्रा तू भगवंताच्या चरणी प्रणाम करून व त्यांच्या वाणीचे अनुकरण करून कर्माचे चांगल्या प्रकारे आराधन म्हणजे आचरण करावेस.

चन्द्रहासविरचितं ॥ श्रीविठ्ठलाष्टकम् ॥

 

चन्द्रहासविरचितं
॥ श्रीविठ्ठलाष्टकम् ॥

श्रीरुक्मिणीवरं नाथं
चारुरूपं सतां प्रियम्।
वन्दे त्वां सत्यभामापं
नः स्वस्तये पुनःपुनः॥1

श्रीपरब्रह्मरूपं त्वां
मातृहृदयकोमलम्।
श्रीविठ्ठल, नमामि त्वां
नः स्वस्तये पुनःपुनः॥2

श्रीपुण्डलिकभक्तं च
भक्तवत्सलमीश्वरम्।
चन्द्रभागाभगं वन्दे
नः स्वस्तये पुनःपुनः॥3

श्रीवत्सचिह्नयुक्तं त्वां
धर्मसूत्रं च धारिणम्।
पुराणपुरुषं वन्दे
नः स्वस्तये पुनःपुनः॥4

श्रीकौस्तुभं धरन्तं त्वां
तुलसीभूषणप्रियम्।
सकलजनवन्द्यं त्वां
नः स्वस्तये पुनःपुनः॥5

श्रीवैजयन्ति वन्दे त्वां
प्रभुकण्ठनिवासिनीम्।
तुलसीमञ्जिरीं वन्दे
नः स्वस्तये पुनःपुनः॥6

श्रीचरणारविन्दश्रीं
तिलकचन्दनार्चिताम्।
वन्दे त्वाममृतां भक्त्या
नः स्वस्तये पुनःपुनः॥7

श्रीमद्सद्सहितं वन्दे
चतुर्फलप्रदायकम्।
प्रियकरं प्रियं वन्दे
नः स्वस्तये पुनःपुनः॥8

कविचन्द्रहासविरचित- हर्षप्रसारकजनप्रशंसनम्।

 

कविचन्द्रहासविरचित-
हर्षप्रसारकजनप्रशंसनम्।

केचन मानवाः सत्यम्
उल्लसिता भवन्ति ते।
आनन्दः स्वयमायाति
यत्र यत्र प्रयान्ति ते॥
खरंच, काही माणसे उर्जावान किंवा उल्लासयुक्त असतात. ते जेथे जेथे जातात; आनंद स्वतःहून तेथे तेथे येतो.


मन्ये दैवतलोका हि
स्वयं भूलोकमागत्य।
उपकुर्वन्ति सर्वान् च
प्रसार्य हर्षमेव वै॥
खरोखर देवता गणच पृथ्वीवर येऊन हर्षोल्लासाचा प्रसार करून सर्वाना उपकृत करतात.


विजयः सुयशस्तेषां
च सर्वत्र भवेत् सदा।
कामयेऽहं कृते तेषां
प्रार्थये च सदा सदा॥
सर्वत्र त्यांचा विजय व्हावा, त्यांना सदा सुयश असावे अशी मी इच्छा करतो व त्यांच्यासाठी प्रार्थना करतो.

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...